आपल्या फेसूबक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक झालेल्या केतकी चितळेच्या अडचणींत वाढ झाली आहे. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. हा अत्यंत गंभार स्वरुपाचा गुन्हा असल्याचे सांगत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
जामीन अर्ज फेटाळला
केतकीवर याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केतकीच्या वकिलांकडून ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी देताना न्यायाधीशांनी हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने केतकीला जामीन देता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे रबाळे पोलिस स्टेशन येथे तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील जामिनाबाबत अजून पोलिसांचा जबाब येणे बाकी असल्यामुळे केतकीचा तुरुंगातील मुक्काम चांगलाच वाढणार आहे.
2020 साली झाला होता गुन्हा दाखल
केतकीविरुद्ध 2020 साली रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. यासाठी तिने 8 महिन्यांपूर्वी तिने ठाणे न्यायालयात केलेला जामीन अर्जही न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तिला 19 मे रोजी रबाळे पालिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यातील केतकीला 7 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community