ठाण्यात कोरोना रुग्णांची शंभरी पार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हजारीपार गेलेली असताना गुरुवारी ठाण्यातही कोरोना रुग्णांच्या आकड्याने शंभरीचा आकडा ओलांडला. गुरुवारी राज्यातही २३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यात १ हजार १०९ कोरोना रूग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे खालोखाल ठाण्यातही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारी ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे.

( हेही वाचा : रेल्वे सेवा अधिक सुरक्षित होणार का? )

घाबरण्याचे कारण नाही

गुरुवारी ठाण्यात नव्या ९ रुग्णांची नोंद झाली. या नव्या रुग्णांमुळे ठाण्यात आता १०९ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत आता ६८३ रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर पुण्यात २२९ कोरोना रुग्ण आहेत. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्क्यांवर कायम असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here