ठाणे पालिकेच्या सेवेत कार्यरत असताना माधव नामा शिंदे यांचा कर्तव्यावर असताना ३ मार्च १९८४ रोजी मृत्यू झाला. मुलगा अल्पवयीन होता. मुलगा सुधीर माधव शिंदे सज्ञान होताच १९९३ पासून सातत्याने वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला. मात्र तब्बल १४ वर्षापेक्षा जास्त पाठपुरावा केल्यानंतरही सुधीर शिंदे हा नोकरीपासून वंचित आहे. तर पालिका अधिकारी आणि आस्थापना विभाग मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन पात्र नसल्याचे सांगत आहे.
(हेही वाचा – मुंबईपाठोपाठ ‘या’ शहरातील हवेची गुणवत्ता खालावली)
ठाणे पालिकेच्या सेवेत माधव नामा शिंदे यांचा कर्तव्यावर असताना ३ मार्च १९८३ साली मृत्यू झाला. तत्पूर्वी माधव शिंदे हयात असतानाच त्यांची पत्नी ही सफाई खात्यात कामाला लागलेली होती. माधव शिंदेंचा मृत्यू झाला तेव्हा दावेदार सुधीर शिंदे हा ६ वर्षाचा होता. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालिकेकडे वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासाठी अर्ज केला. शासनाचा त्यावेळचा अध्यादेश आणि सन २०२१ चा अध्यादेशमध्ये तरतूद असतानाही सुधीर माधव शिंदे या तरुणाला तब्बल १५ वर्षापेक्षा अधिक काळ नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. नोकरीसाठी प्रथम अर्ज १०\९\१९९३, दुसरा अजॅ ३०\१२\१९९४ त्यानंतर आता पर्यंत तब्बल २० पेक्षा जास्त विनंती अर्ज केले. मात्र अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यात आले नाही.
१५ ते २० वर्षांपासून नोकरी पासून वंचित
पालिका सेवेत मृतक माधव शिंदे यांची पत्नी कार्यरत होती. अशी सबब पुढे करण्यात येत आहे. मात्र पालिकेत अनेक पती-पत्नी पालिकेत नोकरीला होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. आजही पिता पुत्र, माय लेक, दोन भाऊ पालिका सेवेत कार्यरत आहेत. मग सुधीर शिंदेबाबत पालिका प्रशासन आणि आस्थापना विभागातील अधिकारी यांच्या उदासीनतेने सुधीर शिंदे हा १५ ते २० वर्षांपासून नोकरी पासून वंचित आहे. सदरचा अन्यायाच्या विरोधात आपण कोर्टात दाद मागणार असून शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागणार असल्याची माहिती नोकरी लालफितीत अडकलेल्या सुधीर शिंदे यांनी दिली.
मुदतीत अर्ज न केल्याने नोकरीवर आली गदा
अनुकंपा तटावर नोकरीची मागणी करणारे सुधीर माधव शिंदे हे त्यांचे वडील माधव नामा शिंदे हे पालिका सेवेत कार्यरत असतानाच ३ मार्च १९८४ रोजी निधन झाले. तर पालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून मृतक शिंदे यांची पत्नी पुष्प शिंदे या १ डिसेंबर, १९८२ पासून पालिका सेवेत कार्यरत होत्या. तर सुधीर शिंदे हा ८ वर्ष ११ महिने २७ दिवसाचे होते. त्यांनी अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी सज्ञान होताच ७ मार्च १९९४ पूर्वी अर्ज करणे गरजेचे होते. त्यांनी ३० डिसेंबर १९९४ अर्ज नमूद केल्याने आणि त्यांची आई सेवेत असल्याने अनुकंपा तत्वावर नोकरीस पात्र ठरत नसल्याचे आणि एकाच कुटुंबातील दोन जणांना सामावून घेणे नियमबाह्य असल्याचे कारण पालिका आस्थापना विभागाने सुधीर शिंदे आणि महाराष्ट्र लेबर युनियनचे अध्यक्ष चंगो शिंदे यांना लेखी स्वरूपात कळविले. विहित मुदतीत अर्ज न करता ९ महिने उशिरा अर्ज केल्याने दावेदार सुधीर शिंदे हा नोकरीस अपात्र ठरत असल्याचा निर्वाळा पालिका प्रशासन देत आहे.
Join Our WhatsApp Community