देशात पहिल्यांदा मुंबई (Mumbai) आणि ठाणेदरम्यान रेल्वे धावली. त्या ऐतिहासिक घटनेला रविवारी १७० वर्षे पूर्ण होत आहेत. रविवारी ठाणे रेल्वे स्थानकाचा १७० वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे हे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्या घोषणा गेल्या दशकात वेळोवेळी करण्यात आल्या. भारतीय रेल्वेच्या अर्थसंकल्पातही याचा समावेश करण्यात आला. मात्र, याबाबत नंतर कोणत्याच हालचाली न झाल्याने या घोषणा हवेतच विरल्याचे स्पष्ट झाले आहे. (Thane Railway Station )
१६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणेदरम्यान पहिली रेल्वे धावली. सुरुवातीला गाडी धावताना बघून भुताटकी असल्याच्या संशयाने भारतीय लोक घाबरून पळायचे. मात्र, काही दिवसांनी ही भुताटकी नाही तर आपल्या उपयोगाचे साधन असल्याचे उघड झाल्याने ‘साहेबांचा पोर मोठा अकली रे, बिन बैलाची गाडी कसा ढकली रे’, असा गौरवही भारतीय लोक करू लागले हा इतिहास आहे. मात्र, त्यानंतर ज्या प्रमाणात भारतात रेल्वे विकसित होत गेली त्या प्रमाणात ठाणे (Thane) रेल्वे स्थानकाचा विकास काही झाला नाही. ठाणे रेल्वे स्थानक (Thane Railway Station ) हे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे. मात्र, आजची या स्थानकाची दुरवस्था खूपच भयावह आहे. त्यात बदल करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू असतात, मात्र त्यालाही बऱ्याच मर्यादा आहेत.(Thane Railway Station )
दररोजचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त
ठाणे रेल्वे स्थानकातून रोज अंदाजे ७ ते ८ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्याकडून ५० लाखांहून अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे या स्थानकाचे महिन्याचे उत्पन्न सुमारे २० कोटींच्या घरात असून, अंदाजे खर्च ७ कोटी असल्याने खर्चाच्या तुलनेत रेल्वेला महिना जवळपास तिप्पट उत्पन्न या स्थानकातून मिळत असल्याचे सांगण्यात येते. (Thane Railway Station )
ठाणे हे ठाणे शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. ठाणे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते मुंबई महानगर क्षेत्रामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. रोज सुमारे ६.५ लाख प्रवासी ठाण्याहून प्रवास करतात. ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक असून भारतामधील सर्वात पहिली रेल्वे मुंबईच्या बोरी बंदर ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती.(Thane Railway Station )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community