Chandrayaan 3 : चंद्रयान ३ च्या यशानंतर ठाण्याच्या साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सचे इस्रोने का केले कौतुक, वाचा सविस्तर…

यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्ती तोडण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची रिंग ठाण्याच्या साने बदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सनी बनवली

198
Chandrayaan 3 : चंद्रयान ३ च्या यशानंतर ठाण्याच्या साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सचे इस्रोने का केले कौतुक, वाचा सविस्तर...
Chandrayaan 3 : चंद्रयान ३ च्या यशानंतर ठाण्याच्या साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सचे इस्रोने का केले कौतुक, वाचा सविस्तर...

भारताचे चंद्रयान ३ चे बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरले. या मोठ्या मोहिमेत ठाण्याच्या साने बंधूंचेही मोठे योगदान आहे. कोणतेही अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेण्यासाठी डेव्हलपमेंट इंजिनमध्ये ‘घर्षण रिंग’ बसवली जाते. गुरुत्वाकर्षण शक्ती तोडण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची रिंग ठाण्याच्या साने बदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सनी बनवली आहे. चंद्राच्या दक्षिणेध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर ठाणेकर सुरेश साने यांना इस्रोच्या टीमने अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. ‘तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच भारत चंद्रावर उतरू शकला’, असे इस्रोने साने यांचे कौतुक केले आहे.

(हेही वाचा – Madurai Train Fire : लखनौ-रामेश्वरम रेल्वेमध्ये ती एक चूक आणि रेल्वे झाली ‘The Burning Train’)

माजिवडा आणि आसनगाव येथील कारखान्यात काम

चंद्रयान ३ चे 14 जुलै रोजी चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण झाले. 15 दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर चंद्रयान मुख्य टप्प्यासाठी सज्ज झाले. सॉफ्ट लँडिंगप्रमाणे हा टप्पाही खूप महत्त्वाचा होता. कोणत्याही उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी ठराविक समयमर्यादेत ढकलणे आवश्यक असते. त्यासाठी इंजिनमध्ये ‘फ्रिक्शन रिंग्ज’ बसवल्या जातात. चंद्रयान ३ मध्ये २ इंजिने बसवण्यात आली असून विकास इंजिनमध्ये ३ मोठ्या आणि २ लहान अशा १० रिंग होत्या. या रिंगचा पाया पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा भंग करण्यास मदत करतो. शहापूर येथील उद्योजक आणि सध्या ठाण्यात राहणारे सुरेश साने आणि गणेश साने यांनी या घर्षण रिंग्ज तयार केल्या आहेत. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून माजिवडा आणि आसनगाव येथील साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्स यांच्या कारखान्यात काम सुरू आहे.

४ मिनिटांत उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर

उपग्रह वाहून नेण्यासाठी इंजिनमध्ये घर्षण रिंग बसवल्या जातात. या रिंगचा उपयोग गुरुत्वाकर्षण शक्ती तोडण्यासाठी केला जातो. अवघ्या ४ मिनिटांत हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर ढकलला जातो. चंद्रयान ३ मधील डेव्हलपमेंट इंजिनमध्ये साने यांच्या कारखान्यात तयार केलेल्या ६ मोठ्या आणि ४ लहान घर्षण रिंग होत्या.

मंगळ मोहिमेतही सहभाग

ठाण्यात रहाणारे शहापूरचे सुरेश साने, साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्स यांचे माजिवडा आणि आसनगाव येथे कारखाने आहेत. गणेश साने आसनगाव येथील युनिट सांभाळतात. साने यांनी पूर्वीच्या मंगळ मोहिमेतील आणि चंद्रयान १, २ आणि आता ३च्या इंजिनसाठी समान घर्षण रिंग बनवल्या होत्या. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल साने यांना २०१३ मध्ये इस्रोने सुवर्णपदक देऊन गौरविले होते. चंद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर, इस्रो टीमने साने ब्रदर्सना एक विशेष संदेश पाठवला असून, साने आणि त्यांच्या टीमचे त्यांच्या कौशल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.