राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात केतकी चितळेला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्या विरोधात 9 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरु असताना रविवारी ठाणे सत्र न्यायालयाकडून यासंदर्भात निर्णय देण्यात आला आहे.
(हेही वाचा – तुमचं हिंदुत्व खोटं! उद्धव ठाकरे हे डरपोक, सोमय्यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल)
त्यानंतर केतकी चितळेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे पोलिसांनी अटक केली असून आज, रविवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती मिळतेय. केतकीने न्यायालयात वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. रविवारी सकाळी केतकीला न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले असल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयात केतकीने काय सांगितले
केतकीने न्यायालयात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे.
( हेही वाचा केतकी चितळेचा राज ठाकरेंनीही केला निषेध! म्हणाले, ही मानसिक विकृती! )
Join Our WhatsApp Community