…म्हणूनच मी आज इथे उभी आहे! असा होता ‘मिस युनिव्हर्स’चा अंतिम प्रश्न?

86

70 व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय हरनाझ संधूने 2000 मध्ये लारा दत्ताने विजेतेपद जिंकल्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर मिस युनिव्हर्सचा मुकुट आपल्या स्वगृही आणला. मेक्सिकोची ‘मिस युनिव्हर्स 2020’ आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाझला मुकुट घातला. हरनाझ संधूचे नाव विजेते म्हणून घोषित होताच, हरनाझ संधूला अश्रूंनी अनावर झाले. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हरनाझ ताज जिंकल्यानंतर काही क्षणांत ‘चक दे ​​फट्टे, इंडिया’ म्हणताना दिसत आहे.

( हेही वाचा : भारताच्या हरनाझ संधूसाठी ‘21’ लकी! पटकवला विश्वसुंदरीचा किताब )

अंतिम प्रश्न

अंतिम प्रश्नोत्तराच्या फेरीदरम्यान, संधूला विचारण्यात आले की, तरुणांनी दडपणाचा सामना कसा करायचा याविषयी काय सल्ला द्याल. “आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे, तुम्ही अद्वितीय आहात हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि हेच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. बाहेर या, स्वतःसाठी बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.

तिसरी ‘मिस युनिव्हर्स’

संधूच्या आधी फक्त दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे – 1994 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता. हरनाझने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धकांना पराभूत करून मुकुट जिंकला. आणि हरनाझ ही भारताची तिसरी ‘मिस युनिव्हर्स’ ठरली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.