‘आप’ची भिस्त नाराजांवर

95

दिल्लीनंतर मुंबई काबिज करायला निघालेला आम आदमी पार्टीने (आप) आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जोरदार तयारीला लागले आहेत. मुंबईत जास्तीत जास्त प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली असून त्यादृष्टीकोनातून उमेदवारांचीही जमवाजमव संघटनांत्मक जुळवाजुळवी सुरु आहे. मात्र, आपकडे तुर्तास तरी डोळ्यासमोर उमेदवार नसून युती आणि आघाडीकडे त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे अशाप्रकारे युती व आघाडी झाल्यास त्या पक्षातील नाराजींना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे विविध पक्षांमधील नाराजी उमेदवारांवरच आपची भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : अखेर १२ वर्षाच्या तपानंतर जळगाववासीयांना मिळतेय दुसरे वन्यजीव अभयारण्य)

मुंबई महापालिकेवरही आपली सत्ता मिळवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु

मुंबई महापालिकेच्या २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आम आदमी पार्टी मुंबईत कामाला लागली. मुंबई महापालिकेच्यावतीने सुरु असलेली विकासकामे, लोकांच्या समस्या तसेच सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने घेतलेले निर्णय याविरोधातही आपने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापनेनंतर आता ‘आप’ ने मुंबई महापालिकेवरही आपली सत्ता मिळवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु केला असला तरी २३६ प्रभागांमध्ये उमेदवार कुठून द्यायचे हा प्रश्न आहे.

नाराज झालेल्यांना आपकडून उमेदवारी दिली जावू शकते

मुंबईतील एरिया लोकल मॅनेजमेंट (एएलएम)आणि खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उमेदवारांचा शोध घेत आप या निवडणुकीत व्हाईट कॉलर उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवू शकते. परंतु याबरोबरच त्यांनी आता महापालिकेच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांनाही अधिकृत पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एवढे करूनही सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा सामना करण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांची जुळवाजुळवा करण्यात त्यांना यश येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती किंवा शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी झाल्यास त्यातून नाराज झालेल्यांना आपकडून उमेदवारी दिली जावू शकते.

ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या या प्रभाग आरक्षणात अनेकांचे विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांचे प्रभाग हे महिला आरक्षित झाले आहे. तर काही प्रभाग खुले झाल्याने या प्रभागांसाठी एकाच पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व नाराजांसाठी आप हा पर्याय राहणार असून आपलाही आता आयते उमेदवार मिळू शकतात,असे बोलले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.