‘हे’ नऊ भारतीय चित्रपट ‘ऑस्कर’च्या शर्यतीत

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्सेसने ऑस्करसाठी पात्र असलेल्या 301 चित्रपटांची स्मरण यादी प्रसिद्ध झाली आहे. या रिमाईंडर यादीत 9 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

रिमाईंडर यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विवध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. तथापि, केवळ यादीत असल्याने 24 जानेवारी रोजी जाहीर होणा-या अकॅडमी अवाॅर्ड्ससाठी चित्रपट अंतिम नामांकनात प्रवेश करेल की नाही, हे तेव्हाच कळेल. पण यानिमित्ताने भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

( हेही वाचा: RRR ने रचला इतिहास; ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ )

‘हे’ नऊ चित्रपट ऑस्करच्या यादीत

  • आरआरआर
  • गंगूबाई काठियावाडी
  • चेलो शो
  • द कश्मीर फाइल्स
  • मी वंसतराव
  • तु्झ्यासाठी काही
  • राॅकेटरी: द नंबी इफेक्ट
  • कांतारा
  • विक्रांत रोना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here