मित्राची हत्या करून रचला बनाव! आरोपीला आठ तासांतच अटक

बबलू चौहानने दिलेल्या तक्रारीवरून ठाकुर्ली ९० फूट रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, मात्र बबलू चौहान याने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असा प्रकार या ठिकाणी असा प्रकार घडला नसल्याचे समोर आले.

73

क्षुल्लक वादातून मित्राची हत्या करून लुटमारीचा बनाव करणाऱ्या मित्राला १२ तासातच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. बबलू चौहान असे अटक करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे.

बेचल प्रसाद चौहान या इसमाचा मृतदेह मंगळवारी सकाळी ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे पोलिसांना मिळाला होता. बेचन प्रसाद याची अज्ञात व्यक्तीने हत्या करून चेहरा दगडाने ठेचला होता. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बेचल प्रसाद याला रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेले!  

दरम्यान डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथे राहणाऱ्या बबलू चौहान याने टिळक नगर पोलिस ठाण्यात पहाटे तक्रार दाखल केली होती की, बेचल प्रसाद आणि मी रात्री दीड वाजता गावी जाण्यासाठी कल्याणला ट्रेन पकडण्यासाठी डोंबिवलीवरून रिक्षाने निघालो होतो, ९० फुटी रोडवर आमची रिक्षा काही जणांनी अडवून आम्हाला रिक्षातून उतरवून रिक्षाचालकला पळवून लावले व आम्हाला दोघांना मारहाण करून लुटले, त्यांच्या तावडीतून मी कसाबसा सुटून पळून आलो, परंतु त्यांनी बेचल प्रसाद याला रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेले, अशी तक्रार बबलूने टिळक नगर पोलिस ठाण्यात केली होती. मृतदेह रेल्वेच्या हद्दीतील असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला.

(हेही वाचा : दसरा मेळावा यंदाही ऑनलाईन की शिवाजी पार्कात? वाचा सविस्तर बातमी)

बबलूने शेलार नाका येथे येऊन लुटमारीचा बनाव रचला 

बबलू चौहानने दिलेल्या तक्रारीवरून ठाकुर्ली ९० फूट रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, मात्र बबलू चौहान याने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी असा प्रकार या ठिकाणी असा प्रकार घडला नसल्याचे समोर आले. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बबलू चौहान याची उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत दारूच्या नशेत बबलू आणि बेचल प्रसाद यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यानंतर हे गावी पकडण्यासाठी कल्याणला रिक्षाने निघाले होते, रिक्षात देखील त्यांचा वाद सुरू होता. या दोघांनी ९० फूट रोड येथे रिक्षा सोडली व कोण कुणाला मारतो, असे बोलून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बबलूने त्याच्याकडे असणारे सुताराचे हत्याराने बेचल प्रसाद याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली आणि मृतदेह रेल्वे रुळालगत आणून ठेवला. त्यानंतर दगडाने डोके ठेचून बबलूने शेलार नाका येथे येऊन लुटमारीचा बनाव रचला होता, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वपोनी. मुकेश ढगे यांनी दिली. या प्रकरणी बबलू चौहान याला मित्राच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.