दिल्लीपेक्षाही मुंबईतील ‘या’ तीन ठिकाणांची हवा बिघडली, घराबाहेर जाताना मास्क लावा

116

आता कोरोनानंतर वाढत्या हवा प्रदूषणामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क लावणे गरजेचे असल्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईच्या हवेचा दर्जा ढासळला आहे. संपूर्ण मुंबई शहराच्या तुलनेत माझगाव आणि चेंबूर या दोन्ही ठिकाणांच्या हवेचा दर्जा जास्त ढासळला होता. मुंबईत हवेचा दर्जा 309वर असताना माझगाव येथे हवेचा दर्जा 332 तर चेंबूरमध्ये 315 प्रति क्यूबीक मीटरपर्यंत पोहोचल्याने या भागांतील हवा अतिखराब असल्याचे निरीक्षण सफर या ऑनलाईन प्रणालीत दर्शवण्यात आले.

शुक्रवारी मुंबईतील किमान तापमान 18 अंशापर्यंत खाली घसरले. तर कमाल तापमान 31.7 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. तापमान खालवताच मुंबईत सकाळी आणि सायंकाळी थंडीचा प्रभावही जास्तच होता. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत हवेचा दर्जा खालावत असल्याने दिवसभर दृष्यमान्यताही खराब झाली आहे. अशातच मुंबईतील ब-याच भागांत हवेचा दर्जा खराबच दिसून येत आहे.

मुंबईतील स्थानके 

अतिखराब स्थानके – अतिसूक्ष्म धूलिकणांची मात्रा – प्रति क्यूबीक मीटरमध्ये

  • माझगाव – 332
  • चेंबूर – 136

खराब स्थानके –

  • वांद्रे-कुर्ला संकुल – 283
  • मालाड – 256
  • भांडूप – 228
  • कुलाबा – 201

समाधानकारक स्थानके –

  • अंधेरी – 183
  • नवी मुंबई – 182
  • बोरिवली – 162
  • वरळी 132

काय काळजी घ्याल

  • कफ, छातीत जळजळ, श्वसनाचा किंवा चक्कर येत असल्यास शारिरीक हालचाल कमी करा
  • घराच्या खिडक्या बंद करा
  • लाकूड, मेणबत्त्या जाळू नका
  • घरात बाहेरून धूळ कमी येईल, यासाठी जमीन आणि खिडक्या ओल्या फडक्याने पुसत रहा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.