मीनाताई ठाकरे मंडईसमोरील भाग स्वच्छ आणि सुंदर!

104

दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील प्रमोद महाजन उद्यान आणि मीनाताई ठाकरे फुल मंडईसमोरील भागात फुल विक्रेत्यांसह अनेकांनी आपले संसार थाटत या परिसराला बकाल केले आहे. परंतु बकाल झालेल्या या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून सीएसआर निधीतून हे काम केले जात आहे. त्यामुळे मीनाताई ठाकरे मंडईसह प्रमोद महाजन उद्यानासमोरील भाग स्वच्छ आणि सुंदर होणार आहे.

अतिक्रमण हटवण्याचे प्रशासनाला निर्देश 

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जुलै महिन्यात दादरमधील प्रमोद महाजन मैदानाची पाहणी करताना येथील सेनापती बापट मार्गावर असलेले अतिक्रमण हटवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. तसेच येथील पदपथांची दुरुस्ती करून या भागाचे सौंदर्यीकरण करण्याचेही निर्देश दिले होते. याठिकाणी लोकांचे अतिक्रमणांसह मासळी मंडईसमोरील मासळी विक्रीचा कचरा व त्यासाठी लागणारे साहित्य, भुसा, थर्माकोलचा कचरा याशिवाय कच्च्या झोपड्याही दिसून आल्या होत्या. या सर्व झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याचे निर्देश पर्यावरण मंत्र्यांनी दिले होते.

(हेही वाचा – महापालिका रुग्णालयांचे ऑनलाईन अ‍ॅप? लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी)

‘या’ कंपनीच्या सीएसआर निधीतून सौंदर्यीकरण

या रस्त्याचा भाग हा जी/उत्तर व आणि जी दक्षिण भागात येत असून जी दक्षिण भागातील सेनापती बापट मार्गावरील दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. हे काम न्युक्लिअस ग्रुप व मेसर्स स्टुडीओपॉर्ड अंतर्गत व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर निधीमधून केले जात आहे. तसेच जी उत्तर विभागाच्या हद्दीतील दादर एस.टी. स्टँडपर्यंतच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारीही या कंपनीच्या सीएसआर निधीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रमोद महाजन उद्यानाच्या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी व सौंदर्यीकरणासह उद्यान परिसरातील पदपथांचेही सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दादरमधील सेनापती बापट मार्गाच्या बकाल परिसराचे चित्र पालटून सौंदर्यीत झालेला पहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.