‘या’ स्वयंचलित केंद्रातील तापमानाचा नवा रॅकोर्ड

175

विदर्भात सुरु असलेली उष्णतेची लाट कमी झालेली असताना अंतर्गत कोकणातील कमाल तापमान या आठवड्यापासून जास्त नोंदवले जात आहे. अंतर्गत कोकणात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असताना कर्जत येथील स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या तापमानाने देशातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद केली. तसेच जागतिक क्रमवारीतील उष्ण शहरांच्या यादीत अप्रत्यक्षरित्या दुसरा क्रमांक मिळवला.

कर्जतच्या कमाल तापमानाने फतेहगडला टाकले मागे

भारतीय वेधशाळा आपल्या स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमान सार्वजनिक पातळीवर जाहीर करत नाही. त्यामुळे स्वयंचलित केंद्रातील तापमान मोजणी ही ग्राह्य धरली जात नाही. देशात उत्तर प्रदेशातील फतेहगड येथील कमाल तापमान शुक्रवारी सर्वात जास्त होते. फतेहगड येथील कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मात्र कर्जतच्या कमाल तापमानाने फतेहगडलाही मागे टाकले.

कमाल तापमानात वाढ

खासगी अभ्यासकांच्या नोंदीतून, कर्जतनजीकच्या बदलापूरात ४१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. उल्हासनगर ४२ तर कल्याण-डोंबिवलीत ४१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ठाण्यात आणि नवीमुंबईतही अनुक्रमे ४१.३ तर ४०.७ अंश सेल्सिअसएवढी कमाल तापमानात वाढ दिसून आली. विरारमध्ये ४० अंशापर्यंत कमाल तापमान पोहोचले.

मुंबईतही सरासरीहून अधिक तापमान 

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. पवई आणि मुलुंडमध्ये कमाल तापमान अनुक्रमे ४१ आणि ४१.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.