सहाशे किलो स्फोटकांद्वारे पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडणार

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचे नियोजन पूर्ण झाले असून रविवारी (२ ऑक्टोबर) मध्यरात्री २ वाजता हा पूल पाडला जाणार आहे. पूल पाडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. हा पूल पाडण्यासाठी तब्बल ६०० किलो स्फोटके वापरले जाणार असून केवळ ८ ते १० सेकंदांत हा पूल पाडला जाणार आहे. केवळ चार अधिकारी हे काम करणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलाच्या २०० मीटर परिसरातील बिल्डिंग रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तशा नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे.

केवळ १० सेकंदांत पाडणार हा पूल 

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील पूल पाडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. शनिवारी (दि १) रात्री ११ वाजता ते रविवारी (दि २) सकाळी ८ पर्यंत पूल पाडण्याचे काम केले जाणार आहे. ब्लास्टिंग पद्धतीने हा पूल पाडला जाणार आहे. एडिफिस इंजिनिअरिंग ही कंपनी हा पूल पडणार आहे. नुकतेच या कंपनीने नोएडा येथील ट्विन टॉवर पाडण्याचे काम केले आहे. शनिवारी रात्री ११ पासून येथील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. हा पूल पाडण्यासाठी तब्बल दीड मीटर खोलीचे १३०० होल पाडण्यात आले आहेत. त्यात स्फोटके भरून केवळ १० सेकंदांत हा पूल पाडला जाणार आहे.

(हेही वाचा – ‘माझे भाषण पूर्ण ऐका…’, मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानाचा पंकजा मुंडेंनी केला खुलासा)

यावेळी संपूर्ण परिसर बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे. पूल पडल्यानंतर राडा रोडा हटवण्यासाठी चार बुलडोजर, आठ पोकलेन, ३० टिप्पर आणि १०० लेबरची व्यवस्था करण्यात आली आहे. पूल पाडताना २०० मीटर परिसरात केवळ लोक उपस्थित राहणार आहेत. शॉर्ट फायरर, प्रोजेक्ट मेनेजर, ब्लास्ट डिझायनर आणि पोलिस अधिकारी हे सुरक्षित ठिकाणी थांबणार आहेत. ही चार लोक नियंत्रित ब्लास्ट पद्धतीने हा पूल पाडतील. स्फोटानंतर १५ मिनिटांत पूल परिसरात जीवंत स्फोटकांच्या पाहणीनंतर राडा रोडा काढण्याचे काम सुरू केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here