नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाहीने घेतला पेट

नाशिक- औरंगाबाद मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवाशाही बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील राज्यभरात अनेकदा शिवशाही बसला आग लागल्याचे प्रकार घडले असून अद्याप शिवशाहीला आग लागल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

कुठे घडला प्रकार

ही घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे या ठिकाणी घडली. ही शिवशाही औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने जात असताना देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमध्ये साधारण १५ प्रवासी होते. ही बस बंद पडल्याने यातील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले होते. त्यानंतर काही वेळाने या बसने पेट घेतला. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

(हेही वाचा – स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा: अर्ध्या तासानंतर राज्यपालांच्या कार्यक्रमातील वीजपुरवठा पूर्ववत)

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील सांगलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर बस चालकाने ही बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गड्याही घटनास्थळी पाचारण कऱण्यात आल्यात. त्यांनी या गाडीला लागलेली आग नियंत्रणात लागली. या बसमध्ये त्यावेळी ४० प्रवासी होते. चालकाच्या प्रसंगवधनाने सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात देखील शिवाशाही बसला आग लागल्याने खळबळ उडाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here