रायगडच्या घोणसे घाटात बस दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, ३४ जखमी

124

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस सकाळी आठच्या सुमारास साठ फूट खोल दरीत कोसळली आहे. प्रशासनाने जाहीर केल्यानुसार या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत.

जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे.

बस 60 फूट खाली कोसळली

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली आहे. सर्व यंत्रणा तत्काळ मदातकार्यास लागली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून, अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. नालासोपारा येथून एक खाजगी बस निघाली होती. तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे. MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. रायगडच्या घोणसे घाटात हा भीषण अपघात झाला. ही बस पुलावरुन 60 फूट खाली कोसळली.

( हेही वाचा: प्रेमविरहातून प्रेयसीची स्कुटी जाळली; आगीत गेला सात जणांचा बळी )

मदतकार्य युद्धपातळीवर सुरु

प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान मृतांची ओळख पटवण्याची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.