पुणे- नगर महामार्गावर बजरंगवाडी येथे प्रवासी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी बसमधील २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने डिव्हायडर तोडून नगरकडे जाणाऱ्या प्रवासी बसला धडक दिली. कारने धडक दिल्याने ही बस पलटी होऊन हा भीषण अपघात झाला.
चालकावर गुन्हा दाखल
कार आणि बसचा अपघात एका हॉटेल समोर झाला आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमे-यात ही घटना कैद झाली. भरधाव बस एका बाजूला पलटी झाली आणि 100 ते 200 फूट अंतर घसरत हॉटेलच्या परिसरात घुसली होती. कार चालकावर निष्काळजीपणा करत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा: …अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल,संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा )
असा झाला विचित्र अपघात
पुणे-नगर महामार्गावर बजरंगवाडी येथे रविवारी रात्री विचित्र अपघात घडला. लक्झरी बस पुण्याहून नगरकडे जात होती. यावेळी स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटला आणि कार समोरुन येणाऱ्या बसला धडकली. यावेळी बस पलटी होऊन अपघात झाला. बसमधील २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community