कॅश इनचार्जनेच स्टेट बँकेला घातला 5 कोटींचा गंडा

136

स्टेट बॅंकेच्या एका शाखेत रोखपाल प्रमुख (Cash Incharge) पदावर काम करणा-या कर्मचा-याने बॅंकेच्या तिजोरीतून 5 कोटी 23 लाख रुपयांची रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याचे उघडकीस आले असून, या रोखपाल प्रमुखाला सीबीआयने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील नरसापूर येथील बॅंकेच्या शाखेत ए. नागेंद्र नावाची व्यक्ती रोखपाल प्रमुख म्हणून काम करते. शाखेतील सर्व रोख रक्कम आणि लाॅकर्समध्ये जमा असलेला ऐवज याच्या व्यवहाराची आणि देखरेखीची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच, तिजोरीच्या चाव्याही त्याच्याच हातात असतात. 21 जून रोजी नागेंद्र बॅंकेत कामाला आला नाही. त्यावेळी बॅंक शाखेच्या मॅनेजरने त्याला फोन करुन त्याच्या ठावठिकाणाबद्दल माहिती विचारली. मात्र, एका नातेवाईकांचा मृत्यू झाल्यामुळे आपण बॅंकेत अर्धा तास उशिरा येत असल्याचे त्याने सांगितले.

मात्र, दुपार उलटून गेली तरीही तो बॅंकेत आला नाही. त्यावेळी बॅंक मॅनेजरने त्याला वारंवार फोन केले. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे समजले. तसेच बॅंकेने त्याच्या घरीही एका कर्मचा-याला पाठवले. मात्र, तो घरीही नव्हता. त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान, बॅंकेचा एक ग्राहक बॅंकेत आला आणि त्याने बॅंकेत काम करणा-या सफाई कामगाराला बॅंकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या.

( हेही वाचा: राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… )

अशी उघडकीस आली चोरी 

बॅंक मॅनेजरसह बॅंकेतील कर्मचारी या प्रकाराने चक्रावून गेले आणि त्यांनी तिजोरी उघडून त्यातील रक्कम पाहिली आणि ऐवजाची पडताळणी सुरु केली. यावेळी 2 कोटी 32 लाख रुपयांची रोकड, तारणापोटी बॅंकेत जमा असलेले सोन्याचे दागिने आणि तीन एटीएमध्ये भरण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रकमेपैकी 2 कोटी 19 लाख रुपयांची रोख अशी एकूण 5 कोटी 23 लाख रुपयांची रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.