सध्या सुरू असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमत 588 नियम शिथिल करण्यासोबतच केंद्र सरकारने भंगारची विल्हेवाट लावत, 254.21 कोटी रुपये कमावले आहे, अशी माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिली.
(हेही वाचा – … म्हणून ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे ठरली निकामी!)
यासंदर्भात जितेंद्र सिंह म्हणाले की, 40 लाख फायलींचा फेरआढावा घेण्यात आला असून, आतापर्यंत 37.19 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी तसेच प्रलंबितता कमी करण्यात मंत्रालय आणि विभागांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
भंगाराच्या विल्हेवाटीतून आतापर्यंत 254.21 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण 588 नियम शिथिल करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे वर्तणुकीतील बदल घडून आला आहे आणि प्रशासनात नाविन्य आल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community