UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. आता परदेशातील भारतीय नागरिकांनाही व्यवहारासाठी युपीआयचा वापर करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. 10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहे. 10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्या आधारे या रक्कमेची देवाण-घेवाण करता येईल. सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाॅंगकाॅंग, ओमान, कतर, सऊदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि इंग्ंलडमध्ये UPI सेवा सुरु करण्यात आली आहे.
( हेही वाचा: Passport Ranking : जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे या देशाचा! भारत कितव्या स्थानी? पहा संपूर्ण यादी…)