‘या’ दहा देशांतील भारतीयांसाठी खास सुविधा; केंद्र सरकारने आखली योजना

UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. आता परदेशातील भारतीय नागरिकांनाही व्यवहारासाठी युपीआयचा वापर करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. 10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहे. 10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्या आधारे या रक्कमेची देवाण-घेवाण करता येईल. सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाॅंगकाॅंग, ओमान, कतर, सऊदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि इंग्ंलडमध्ये UPI सेवा सुरु करण्यात आली आहे.

(  हेही वाचा: Passport Ranking : जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे या देशाचा! भारत कितव्या स्थानी? पहा संपूर्ण यादी…)

NRO खाते परदेशातील भारतीयांसाठी फायदेशीर 

राष्ट्रीय देयके महामंडळानुसार, NRI अथवा एनआरओ युपीआय व्यवहार करु शकतील. यासर्व प्रक्रियेसाठी पार्टनर बॅंकांसाठी 30 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. NRI खाते परदेशातील भारतीयांना परदेशातील कमाई आता भारतातील खात्यात सहज हस्तांतरित करता येणार आहे. एनआरओ अकाऊंट नागरिकांना भारतातील कमाईचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल.

सामान्य वापरकर्त्यासह व्यापा-यापर्यंत सर्वांना मोठा फायदा

केंद्र सरकाराने रुपे डेबिट कार्ड आणि भीम- युपीआय व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापरकर्त्यासह व्यापा-यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे सरकारने त्यासाठी एकूण 2 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here