केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या हफ्त्यात वाढ केली आहे. आता 2 लाख रुपयांच्या विम्यासाठी 436 रुपये मोजावे लागणार आहेत. आधी हा हफ्ता 330 रुपये होता. 1 जूनपासून ही वाढ लागू झाली आहे.
31 मार्चपर्यंतच मुदत
या योजनेत विमाधारकाचे आजारपण अथवा अपघात अशा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रुपये मिळतात. पीएमजेजेबीवाय ही एक टर्म इन्शुरन्स योजना आहे. पीएमजेजेबीवाय योजनेचा वार्षिक हफ्ता आता 436 रुपये असले. 25 मे ते 31 मे या कालावधीत या हफ्त्याची रक्कम बॅंक खात्यातून वळती करुन घेतली जाते. त्यासाठी अर्जदाराची सहमती आवश्यक आहे. या योजनेतील संरक्षण कालावधी 1 जून ते 31 मार्च असा असतो. म्हणजेच पाॅलिसी कोणत्याही तारखेला खरेदी केली असली, तरी तिची मुदत 31 मार्चपर्यंतच असेल. पाॅलिसी नोंदणीनंतर 45 दिवसांनी जोखीम संरक्षण सुरु होते.
( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )
Join Our WhatsApp Community