जम्मू-काश्मिरात मुस्लीम दहशतवाद्यांकडून हिंदूंच्या हत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून हिंदू धर्मिय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने श्रीनगरमधील 177 हिंदू शिक्षकांची सुरक्षित ठिकाणी बदली करण्याचे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत 10 हिंदूंची हत्या
जम्मू-काश्मिरात 1990 सारखी परिस्थीती निर्माण झाली असून जिहादी दहशतवादी हिंदूंना लक्ष्य करत त्यांच्या हत्या करत आहेत. सातत्याने वाढत असलेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीतील चर्चेनंतर राज्यातील 177 हिंदू शिक्षकांची बदली करण्याचे निर्देश देण्यास आले आहेत. जम्मू-काश्मिरात 1 मे 2022 पासून आतापर्यंत 10 हिंदूंची हत्या करण्यात आली. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे खोऱ्यातील काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या टार्गेट किंलींगमुळे केंद्र सरकारने हिंदू शिक्षकांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा: अमेरिकन संस्थांचा अहवाल म्हणजे व्होट बँकेचे राजकारण; भारताने अमेरिकेला सुनावले )
Join Our WhatsApp Community