थंडीचा प्रभावात जानेवारी महिना सुरु झाला असतानाच शनिवारची सकाळ पावसाची ठरली. मुंबईसह कोकणपट्ट्यांत पावसाची नोंद झाली. त्यामुळे शनिवारची सकाळ आल्हाददायक ठरली. सकाळपासून उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात घट नोंदवली गेली. पुढील दोन दिवस थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
वेधशाळेने वर्तवला असा अंदाज
गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यातही मुंबई व नजीकच्या परिसरात पाऊस झाला होता. शनिवारी सकाळी पावसाच्या अलगद हजेरीने अचानक मारा करायला सुरुवात केली. मुंबईत पश्चिम उपनगरांत पावसाचा प्रभाव जाणवला. दहिसर, बोरिवली, कांदिवली, जुहू, सांताक्रूझ परिसरात पावसाची हजेरी लागली. दक्षिण मुंबई मात्र कोरडीच राहिली. दुपारनंतर पावसाची हजेरी मुंबई महानगर क्षेत्रातही पावसाची हजेरी लागली. ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरांत पावसाचा जोर आढळून आला. सायंकाळी गारेगार वातावरणामुळे कमाल तापमान खाली सरकले. मुंबईत सांताक्रूझ केंद्रातील कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. सांताक्रूझ केंद्रातील पावसाची नोंद केवळ ४ मिमी झाली. डहाणू आणि नाशकात कमात तापमानात २५ अंश सेल्सिअसवर खाली सरकले.
(हेही वाचा – मोबाईल फोनमधून पेमेंट करणारे बोगस अॅप उघड, तिघांना अटक)
उत्तरेतील वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमी प्रकोप) या वातावरणातील स्थितीमुळे राज्यातील थंडीचा प्रभाव, ढगाळ वातावरण, गारठा असे वातावरण आहे. पुढील दिवसांतही राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने दिला आहे.
राज्यातील हवामानाचा अंदाज
पावसाचा अंदाज
- रविवारी ९ जानेवारीला कोकणात पावसाची शक्यता
- मंगळवारपर्यत मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
- मंगळवारपर्यंत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
- रविवारी विदर्भात पाऊस राहील तर सोमवारी आणि मंगळवारी पाऊस आणि गारपीठीचा इशारा राहील.