त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर काही दिवसांपूर्वी पिंडीवर बर्फ जमा होत असल्याचे समोर आले होते. आता या बर्फामागचे कोडे उलगडले आहे. पिंडीवर जमा होणारा हा बर्फ पुजा-यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी देवस्थान समितीच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली. 30 जून 2022 रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ आढळल्याचे समोर आले होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पाहता बर्फ कसा तयार झाला? यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करुन सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली.
( हेही वाचा: उस्मानाबादमधील उरुसात चेंगराचेंगरी; 14 भाविक जखमी )
चौकशी समितीत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे समोर आले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकलेश्वलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community