बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर कंगना रनौतने शीख धर्मियांना खलिस्तानी आंतकवादी म्हणत एक वादग्रस्त पोस्ट केली. कंगनाचे ट्विटर अकाऊंट यापूर्वीच डिलीट करण्यात आलं असले तरी तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र शीख समुदयाला खालिस्तानी आंतकवादी म्हणणं तिच्या अंगलट आलंय. या वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – राज्यात १ डिसेंबरपासून शाळेत सुरू होणार मुलांचा किलबिलाट!)
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील अक्षेपार्ह पोस्टसंदर्भात ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कंगनाला हजर राहण्यास सांगितले आहे. आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला हजर राहण्यास सांगितले आहे. कायद्यानुसार विधानसभेतर्फे सुनावण्यात आलेल्या समन्सविरुद्ध कोर्टात देखील धाव घेता येत नसल्याने कंगनाला या समितीसमोर हजर राहणं अनिवार्य असणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशी होती कंगनाची पोस्ट
‘खालिस्तानी आतंकवादी आज सरकारला भटकवू शकतात. पण एका महिलेने यांना एका काळी चपलाखाली चिरडलं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तिने त्यांना मच्छरांप्रमाने चिरडलं होतं. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. त्या महिलेच्या मृत्यूच्या कित्येक वर्षानंतर आजही हे लोक तिच्या नावाने कापतात. यांना असाच गुरु हवा.’ पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=446789483460253&id=100043876162121
Join Our WhatsApp Community