११ माणसांना मारून वाघाची जंगलात उडी; सीटी१ आणि टी२ची जमली जोडी!

गडचिरोलीत असलेल्या हल्लेखोर सीटी१ वाघाने अल्पावधीतच तब्बल ११ माणसांचा बळी घेतला. परिणामी, वनविभाग त्याला डोळ्यांत तेल घालून जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु वनविभागाला तुरी देत आता सीटी१ गायब झाला आहे. सध्या तो नजीकच्या वाघीणीसोबत रोमान्स करत असताना वनाधिकारी मात्र त्यांच्या शोधात जंगलात थर्मल ड्रोनच्या साहाय्याने त्याचा मागोवा घेत आहेत.

( हेही वाचा : हत्तींना सांभाळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी बंगालची टीम गडचिरोलीत )

गडचिरोलीत वडसा तालुक्यात देसाईगंज येथे गुरुवारी सकाळी सीटी१ने जंगलात आलेल्या एका इसमावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गावाच्याजवळील जंगलात आठवड्याभरापूर्वी त्याचा वावर सुरु झाल्याचे लक्षात येताच वनविभागाने ताडोबातील वन्यप्राणी बचाव पथकाने वडसात त्याचा शोध सुरू केला. सीटी१ कित्येकदा लागोपाठ दोन हल्ले करतो, त्यामुळे वनविभागही धास्तावले आहे. आजकाल सीटी१ टी२ या वाघीणीसोबत फिरत आहे. टी२ ही मुळात टी१ ची जोडीदार आहे. मात्र सहा वर्षांच्या सीटी१ला टी२ भावली आहे. गडचिरोलीतील दाट जंगलाचा सध्या सीटी१ला फायदा होत आहे. गडचिरोलीत पाऊसही सक्रीय आहे. त्यामुळे वातावरणातील परिस्थितीचा फायदाही सीटी१ला होत आहे. त्याला बेशुद्ध करुन पकडण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे राहिले आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here