स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाचे दर्शन घडवणाऱ्या ‘त्रिवेणी’ या नाटकाचा खर्च राज्य शासन उचलणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.
भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये, तसेच देशासाठी प्राणाची आहूती देणारे असंख्य क्रांतीकारक घडविण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोलाचे योगदान आहे. सावरकर बंधू तुरुंगवासात असताना त्यांच्या सहचरणी सावरकर घराण्यातील बाई, माई आणि ताई या तिघींनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी राष्ट्रकार्याची मशाल धगधगती ठेवली. या तिघींनी केलेला त्याग, त्यांचे समर्पण व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्वराज्य निर्मितीतील भूमिका यावर आधारित “त्रिवेणी” या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि अनुनाद कलाविष्कार बहुउद्देशीय संस्था व संवेदना संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी नागपूर येथे केले जाणार आहे.
(हेही वाचा – Uttar Pradesh : उत्तर प्रदेशचे विद्यार्थी आदि शंकराचार्यांपासून वीर सावरकरांपर्यंत ५० महापुरुषांची चरित्रे अभ्यासणार)
या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्याकरीता येणाऱ्या २ लाख २० हजार ५०० रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात आली.
भगूरमध्ये वीर सावरकर थीम पार्क
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नाशिकच्या भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नुकतीच १५ कोटींची तरतूद केली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने याकरिता पुढाकार घेतला असून, वीर सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community