मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईत बुधवारी ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. तर २ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु गेल्या २४ तासांत १६ हजार ४२० इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर ८ लाख ३४ हजार ९६२ इतक्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोना रूग्ण बरे झालेल्या रूग्णांचा दर ८७ टक्के इतका आहे. असे असले तरी पहिल्या दोन कोरोनाच्या लाटेत वाचलेलं डोंगरी अखेर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.
दररोजची रुग्णवाढ आता १.८५ टक्क्यांवर
समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित रुग्णांची वाढ प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व आणि पश्चिम या भागांमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वात कमी रुग्ण संख्या असलेल्या मरीन लाईन्स आणि डोंगरी भागातही आता रुग्णवाढ दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर १.८५ टक्के एवढा असताना या विभागात अनुक्रमे १.२३ आणि १.११ टक्के एवढा आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार २१ डिसेंबरपासून सुरू झाला असून ०.०३ टक्क्यांवर असलेली दररोजची रुग्णवाढ आता १.८५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
(हेही वाचा – आता सरकारी नोकरीसाठी उर्दू भाषा अनिवार्य नसणार, लडाख सरकारचा मोठा निर्णय!)
अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं रूग्ण वाढीचं कारण
मुंबईत दररोज २० ते ३० टक्के रुग्ण वाढत आहेत. मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. मात्र वांद्रे पश्चिम (एच पश्चिम), अंधेरी पश्चिम (के पश्चिम), जोगेश्वरी, अंधेरी पूर्व (के पूर्व), एम पश्चिम (चेंबूर), सांताक्रूझ ते वांद्रे पूर्व (एच पूर्व) या विभागात रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर अडीच ते तीन टक्क्यांवर पोहोचली आहे. हे विभाग पुन्हा हॉटस्पॉट ठरत असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी असे सांगितले की, तिसऱ्या लाटेत डोंगरी भागात रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यामुळे रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते.
Join Our WhatsApp Community