Local Train: धावत्या लोकलमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

accident news old women died while crossing railway track near asangaon railway station
आसनगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू!

मुंबईकरांची लाईफलाईन असणा-या लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईत धावत्या लोकलमध्ये ही भयानक घटना घडली आहे. लोकलच्या लगेज डब्ब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडली आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर धावणा-या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे लोकल ट्रेनने प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

धावत्या लोकलच्या लगेज डब्ब्यात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. या वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. वृद्धाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

( हेही वाचा: मनसे नेते संदीप देशपांडेंवर मार्निंग वाॅक करताना हल्ला; रुग्णालयात दाखल )

नेमकं घडले तरी काय?

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये या वृद्धाची हत्या झाल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. हत्या झालेल्या वृद्धाचे नाव बबन देशमुख आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यातदेखील घेतले आहे.

बबन देशमुख हे आंबिवली येथे राहणारे आहेत. आंबिवली येथून लोकल पकडून ते काही कामानिमित्त कल्याणला आले होते. काम आटपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यासाठी त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याकडे जाणारी लोकल पकडली. देशमुख लगेजच्या डब्यातून प्रवास करत होते. मात्र, लोकलमध्ये चढताना किंवा बसण्याच्या कारणावरुन इथे वाद होऊन त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला. देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिका रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन झाली हे पोलीस तपासानंतर समोर येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here