सतीश कौशिक यांच्या फार्म हाऊसवर आढळली ‘आक्षेपार्ह औषधे’

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. ज्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक थांबले होते. त्याठिकाणी पोलिसांना तपासणी केली असता, आक्षेपार्ह औषधे सापडली आहेत. होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची पोलिसांनी यादी तयार केली असून, त्यातील एक उद्योजक सध्या फरार असल्याचे समजते आहे.

फार्म हाऊसमध्ये आक्षेपार्ह औषधं

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधे सापडली. यानंतर पोलीस सतीश कौशिक यांच्या सविस्तर पोस्टमाॅर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत.

( हेही वाचा: 500 रुपये द्या Copy करा, गडचिरोलीत प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल )

होळीला आलेल्या पाहुण्यांची यादी तयार

होळीच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात आली आहे. त्यावेळी सतीश कौशिक यांच्यासोबत जे लोक फार्महाऊसमध्ये होते, त्या सर्वांची यादी तायर केली आहे. सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.  

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here