Kedarnath उत्तराखंडच्या अप्पर गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात सुमारे सहा महिने बंद राहिल्यानंतर भाविकांसाठी पुन्हा उघडले जातील आणि त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ४ मे रोजी उघडतील. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल यांनी ही माहिती दिली आहे.Kedarnath
थापलियाल म्हणाले की, महाशिवरात्रीच्या पवित्र सणाला, बाबा केदारनाथ यांचे हिवाळी आसन असलेल्या उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात पारंपारिक प्रार्थना केल्यानंतर, धार्मिक गुरु आणि वेदपाठींनी पंचांग बघितले केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याचा शुभ मुहूर्त शोधून काढला. या पारंपारिक पूजेसाठी, ओंकारेश्वर मंदिर फुलांनी भव्यपणे सजवण्यात आले होते. या कार्यक्रमात केदारनाथ Kedarnath मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमाशंकर लिंग, केदारनाथच्या आमदार आशा नौटियाल, मंदिर समितीचे अधिकारी आणि धार्मिक अधिकारी यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.
गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडणार
गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसार ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने दोन्ही धामचे दरवाजे उघडतील. थापलियाल म्हणाले की, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी शुक्रवारी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी उघडले जातील, तर बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडले जातील. केदारनाथ Kedarnath मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या शुभ मुहूर्ताची घोषणा होत असताना, गढवाल हिमालयातील चारही पवित्र तीर्थक्षेत्रे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community