शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी कारवाई; पार्थ चॅटर्जींना ईडीकडून अटक

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे.

ईडीने शुक्रवारी रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. यादरम्यान 20 कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त करण्यात आले. तसेच छापेमारीत अनेक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे. कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी “ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार टीका केली होती.

घोटाळा झाला तेव्हा पार्थ शिक्षणमंत्री 

छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते.

( हेही वाचा: शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आपण दु:खी होतो; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य )

नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले 

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here