मुख्तार अन्सारीच्या 15 ठिकाणांवर ईडीची छापेमारी

170

माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारींचा पुतण्या आणि बाहुबली मुख्तार अन्सारीच्या 15 ठिकाण्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली, लखनौ, गाझीपूर आणि मऊ येथील अनेक 15 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये मुख्तारच्या मुहम्मदाबादमधील घराचा देखील समावेश आहे.

ईडीने मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली आहे. ईडीने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील लखनौ, मऊ आणि गाझीपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात अन्सारींच्या मुहम्मदाबादमधील घराचाही समावेश आहे. याशिवाय, ईडीनं विक्रम अग्रहरी आणि गणेश मिश्रा यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत. एवढंच नाही तर खान बस सर्व्हिसच्या मालकावरही ईडीनं छापे टाकले आहेत. ईडीने मार्च 2021 मध्ये अन्सारीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मुख्तारवर 2020 मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात लखनऊमध्ये फसवणूक करून मालमत्ता बळकावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. अन्सारी यांच्यावर आमदार निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. यातील अनेक प्रकरणे मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येतात. या प्रकरणी ईडीने तुरुंगात जाऊन अन्सारी यांची चौकशी केली होती. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अन्सारीच्या दोन मुलांची देखील चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान एका कंपनीच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार होत असल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकरणाचा तपास पुढे नेत ईडीने एलडीएकडून अन्सारी यांच्याशी संबंधित मालमत्तेचा तपशील मागवला होता. तेव्हापासून छापे पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

( हेही वाचा: महाराष्ट्रात घातपाताचा प्रयत्न; श्रीवर्धनमध्ये सापडल्या संशयास्पद बोटी, AK-47 सापडल्याने खळबळ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.