डम्पिंग ग्राऊंडची जागा नेमकी किती?

कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडच्या उभारणीला आता बारा वर्ष झाली आहेत. या डम्पिंग ग्राऊंडच्या जाचातून आमची मुक्तता कधी होणार असा प्रश्न स्थानिक रहिवाश्यांना पडला आहे. या डम्पिंग ग्राऊंडविरोधात कन्नमवार असोसिएशन ही स्थानिक रहिवासी संघटना न्यायालयाच्या सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. अॅड अभिजीत राणे यांच्या मदतीने हा लढा उभा राहिला असला तरी सुनावणीच्या तारखांच्या विलंबामुळे आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे रहिवासी सांगतात.

कांजूरमार्ग डम्पिंगच्या उभारणीत किती आवश्यक परवानग्या घेतल्या गेल्या, याबाबत सर्वच बाबी संशयाच्या भोव-यात आहेत. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊण्डपासून जवळच राहणा-या संजय येवले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आवश्यक परवानग्यांमध्ये विमानतळ प्राधिकरणाचीही परवागनी लागते. अगोदर डम्पिंग ग्राऊंड उभारले गेले, त्यानंतर काही वर्षांनी विमानतळ प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र दिले. डम्पिंग ग्राऊंडच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली ग्राऊंड वॉटर ऑथोरिटीची परवानगी अद्याप घेतलेली नाही, असा दावा संजय येवले यांनी केला.

१७ मार्च २००९ साली कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राऊंड उभारणीसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याने परवानगी दिली. आम्ही या डम्पिंग ग्राऊंडच्या घोषणेपासून याविरोधात लढत आहोत. पर्यावरण खात्यातीत नोंदीनुसार, डम्पिंग ग्राऊंडच्या उभारणीसाठी १४१.७७ हॅक्टर जागेची आवश्यकता आहे. मात्र ही जागा आता नक्कीच विनापरवाना लपवून वाढवली जात असल्याचा आरोपही येवले यांनी केला.

डेब्रिजने खारफुटी भरल्या जात आहेत

पालिका बायोरिअॅक्टर सेलचा दावा करत असली तरीही प्रत्यक्षात मातीने खारफुटींच्या जमिनी भरणे तसेच विशेषकरुन डेब्रिजची भानगड समजण्यासारखी नाही, अशी शंका येवले यांनी व्यक्त केली. डेब्रिज टाकून खारफुटी बुजवल्या जात आहेत, असा दावा येवले करतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here