स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे कार्य, त्यानंतर समाज प्रबोधन आणि पुढे प्रखर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या विचारांवर संघटन असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हुबेहूब पडद्यावर मांडण्याची किमया रणदीप हुड्डा यांनी साधली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शित आणि निर्माते असलेले रणदीप हुड्डा यांनी स्वतः या चित्रपटात वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाला ऑस्कर २०२५च्या (Oscars-2025) नामांकनासाठी भारत सरकारने पाठवला आहे.
View this post on Instagram
रणदीप हुड्डा यांनी मानले आभार
अभिनेता रणदीप हुड्डा यांचा 2024 चा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) आगामी ऑस्कर 2025 साठी (Oscars-2025) अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे, अशी घोषणा स्वतः रणदीप हुड्डा यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी भारतीय फिल्म फेडरेशनचे आभारदेखील मानले आहे. (Swatantrya Veer Savarkar) हा चित्रपट वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत रणदीप हुड्डा यांच्या सोबतच या चित्रपटात अंकिता लोखंडे, अमित सियाल, राजेश खेरा आणि मृणाल दत्त यांच्याही भूमिका आहेत. भारतीय इतिहासाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती मला करता आली हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा केलेला संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आणणे या उद्देशासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, असे हुड्डा म्हणाले.
Join Our WhatsApp Community