केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यावर विशेष भर दिला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी याविषयी सर्वप्रथम मांडणी केली होती. त्यांची ही संकल्पना केंद्रीय अर्थसंकल्पात जशीच्या तशी घेण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ सत्रात त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाहक राजेंद्र वराडकर, सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
( हेही वाचा: ‘सांगा अदानीला किती कर्ज दिले?’; RBIचे बँकांना आदेश )
डॉ. जाधव म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा अर्थमंत्र्यांनी धरलेला आग्रह माझ्यासाठी विशेष समाधानकारक आहे. ‘फ्युचर ऑफ दी इंडियन एज्युकेशन सिस्टिम’ या २०२० साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या पुस्तकामध्ये मी ही मांडणी पहिल्यांदा केली होती. त्यामध्ये कोणताही बदल न करता, या तरतुदीचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.
Join Our WhatsApp Community