मुंबईत टोलेजंग इमारती किती? अग्निशमन दलाकडेच आकडेवारी नाही

इलेक्ट्रीक ऑडीटसाठी घेणार पीडब्ल्यूडीची मदत

139

मुंबईत काही दिवसांपूर्वी करीरोड येथील अविघ्न पार्क या टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर आग लागण्याची घटना घडली. त्यापूर्वी प्रभादेवी येथील अल्टा माऊंट या टॉवरमधील इमारतीच्या मजल्यावर आग लागली होती. त्यामुळे टोलेजंग इमारतींमधील आगीची घटना कळीचा मुद्दा मानला जात आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईत अशाप्रकारे टोलेजंग इमारती किती आहेत याचा आकडाच मुंबई अग्निशमन दलाकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खुद्द महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कबुली देत अतिरिक्त आयुक्तांच्या सुचनेनुसार आता इमारत प्रस्ताव विभागाकडून ही माहिती गोळा करण्याचे काम केले जात आहे.

मुंबईत एकूण टोलेजंग इमारती किती?

मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांमध्ये लागणाऱ्या आगींच्या ठिकाणी वेळेवर पोहोचून मदतकार्य सुरु करण्यासाठी फायर बाईक्स खरेदीचा प्रस्ताव आला असता सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर स्पष्टीकरण दिले आहे. हे स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. मुंबईतील सर्व टोलेजंग इमारतींचे फायर ऑडीट करण्यासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेया मुद्दयाचा संदर्भ देत यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे २१७० टोलेजंग इमारतींची माहिती आहे. एवढ्याच इमारतींचे प्रस्ताव अग्निशमन दलाकडे आहे. परंतु टोलेजंग इमारतींची मुंबईत एकूण संख्या किती याची आकडेवारी अग्निशमन दलाकडे आहे. त्यामुळे विकास नियोजन व इमारत प्रस्ताव या विभागाकडून टोलेजंग इमारतींची माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

(हेही वाचा- महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत होणार वाढ)

आजवर मालमत्ता कर आकारल्या जाणाऱ्या इमारतींचा युनिक आयडी क्रमांक वेगळा आहे आणि पाणीपट्टी आकारल्या जाणाऱ्या इमारतींचा युनिक आयडी वेगळा आहे. त्यामुळे ही संख्या अचूक नसून यासंदर्भात सर्व इमारतींचा एकच युनिक आयडी ठेवण्याचा विचार आहे. अशाप्रकारे एकच आयडी असल्याने अग्निशमन दलालाही फायर ऑडीटची कार्यवाही करणे सोपे जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इलेक्ट्रीक ऑडीटसाठी घेणार पीडब्ल्यूडीची मदत

मुंबईतील बहुतांशी इमारतींची आग ही शॉर्टसर्कीटमुळे लागत आहे. त्यामुळे इमारतींचे विद्युत परिक्षण अर्थात इलेक्ट्रीक ऑडीट हे महत्वाचे आहे. फायर ऑडीट करण्यासाठी अग्निशमन दलाने पॅनेल तयार केले आहे. परंतु अशाच प्रकारे इलेक्ट्रीक ऑडीट केल्यास आगी लागण्याचेही प्रमाण कमी होईल. त्यामुळे त्यांचेही पॅनेल बनवण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशाप्रकारचा विभाग असल्याने त्यांच्या माध्यमातून नियुक्त पॅनेल तयार करून इलेक्ट्रीक ऑडीट करण्याचा विचार सुरु असल्याचेही भिडे यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईत ३२७ इमारतींना आग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आली असून त्यातील १०९ जणांकडेन कार्यवाही सुरु आहे. उर्वरीतांनी नोटीसनुसार कार्यवाही केलेली आहे. तर तिन इमारतींविरोधात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.