शिर्डीत धावणार पहिली खासगी ट्रेन

198

भारत गौरव या योजनेअंतर्गत मंगळवारी पहिल्या खासगी रेल्वेगाडीचे उद्घाटन झाले. ही पहिली खासगी रेल्वे कोईम्बतूर ते शिर्डी या दरम्यान धावणार आहे.

भारत गौरव योजना काय आहे?

  • या योजनेअंतर्गत खासगी आणि पर्यटन कंपन्या रेल्वेकडून भाडेतत्वार गाड्या घेऊ शकणार आहेत.
  • भारतीय रेल्वेकडून भाडेतत्वार घेतलेल्या या गाड्या कोणत्या मार्गावर चालवायच्या, भाडे किती आकारायचे आणि सेवा कोणच्या द्यायच्या इत्यादींचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात.
  • खासगी आणि पर्यटन कंपन्यांना रेल्वेगाडी भाडेतत्वावर देताना प्रवाशांची लुबाडणूक होणार नाही, याची खात्री भारतीय रेल्वेने केलेली असते.

योजना कोणाची?

  • भारतीय रेल्वेचीच ही योजना आहे.
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

पहिली खासगी ट्रेन

  • भारत गौरव योजनेंतर्गत कोईम्बतूर ते शिर्डी ही पहिली रेल्वेगाडी धावली.
  • या गाडीला 20 डब्बे जोडण्यात आले आहेत.
  • प्रथम, द्वितीय आणि तृतीय इत्यादी श्रेणींचे वातानुकूलित डबे. त्याबरोबरच स्लीपर कोचचे डबे या गाडीला आहेत.

( हेही वाचा: EPFO: PF च्या नियमांत मोठा बदल, आजच करा हे काम नाहीतर होईल नुकसान )

गाडीत काय काय?

  • ट्रेन कॅप्टनच्या हाती गाडीची सूत्रे असतील.
  • तसेच, एक डाॅक्टर, खासगी सुरक्षा रक्षक हेही गाडीमध्ये तैनात असतील.
  • प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल.
  • दर एक तासाने स्वच्छता कर्मचारी गाडी स्वच्छ करत जातील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.