भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेले आहेत. शंभर वर्षे जुना ऐतिहासिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या डोमच्या आतल्या भागाला तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
गेटवेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले होते. ऐतिहासिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या डोमच्या आतल्या भागात तडे गेले आहेत. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
( हेही वाचा: नागपुरात भिका-यांवर बंदी; काय आहे कारण? )
परदेशातील पर्यटकांचीही गेट वे ऑफ इंडियाला भेट
गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 1924 मध्ये गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले. केवळ देशभरातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकही मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी येतात.