बापरे…गुंडांनी थेट पोलिस आयुक्तालाच मारली गोळी

80

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या खुनातील सराईत गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुंडांनी गोळीबार केला, पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला, अर्धा तास सुरू असलेल्या या थरारानंतर पोलिस पथकांनी तीन गुंडांच्या मुसक्या आवळल्या. या गोळीबारात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा आहेत.

आरोपी सराईत गुन्हेगार 

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर रोजी योगेश जगताप याच्यावर काही गुंडांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात योगेश जगताप हा ठार झाला होता, या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गोळीबारातील आरोपी हे पुण्याच्या चाकण परिसरातील एका शेतात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे आरोपी सराईत गुंड असल्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, सह पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, सपोनि. कांबळे आणि पथक यांनी चाकण तालुक्यातील कोये गावात असणाऱ्या शेतात दाखल झाले. कृष्ण प्रकाश यांनी स्वतः पोलिस पथकाला मार्गदर्शन करीत होते. दरम्यान कोय गावातील शेतात आरोपींची मोटारसायकल दिसली असता तेथील घराची पोलिसांनी झडती घेतली. मात्र पोलिस मागावर असल्याचे कळताच तिन्ही आरोपी टेकडीवर लपून बसले होते.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, आवाजी मतदानास राज्यपालांचा विरोध)

लपलेलया आरोपींसोबत चकमक 

पोलिस पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे बघून आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला, पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व्हिस रिव्हलवरमधून आरोपींच्या दिशेने गोळीबार करून त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र पोलिस अगदी जवळ येत असल्याचे बघून तिघांनी गोळीबार सुरूच ठेवला त्याच वेळी कृष्ण प्रकाश यांनी एका पडलेल्या झाडाच्या आडोशाला बसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात कृष्ण प्रकाश यांनी पडलेले झाड उचलून आरोपीच्या अंगावर टाकले आणि त्याला जागेवरच पकडले. या झटापटीत मात्र कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले. इतर पोलिस पथकाने इतर दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. तब्बल अर्धा तास सुरू असलेल्या या थरारा नंतर पोलिसांनी गणेश हनुमंत मोटे (२३), महेश तुकाराम माने (२३) आणि आश्विन चव्हाण (२१) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. जखमी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.