मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘ईडी’, ‘सीबीआय’ प्रमुखांचा कार्यकाळ वाढवला

अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयच्या (CBI) प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय आज मोदी सरकारने घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही तपास यंत्रणांच्या संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी केली जात होती. मात्र आता प्रमुखांचा कार्यकाळ हा पाच वर्षांपर्यंत असणार आहे. सध्या देशात सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.

असा आहे नवा अध्याध्येश

नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. तसेच प्रत्येकी एक वर्षासाठी तीन वर्ष मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.

(हेही वाचा – एचएससी, एसएससी विद्यार्थ्यांना परीक्षा ‘फी’ परत मिळणार!)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात बदल करून केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला होता परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या राजकीय वर्तुळात विरोधकांतर्फे सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. अशा परिस्थितीत तपास यंत्रणांच्या संचालकांचे कार्यकाळ वाढवणे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here