मुंबईत झालेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या फैसल खत्री याची कबर नियमानुसार १८ महिन्यांनी दुस-या मृतदेहासाठी ती कबरीची जागा दिली जाते. याच स्फोटातील फाशी देण्यात आलेला गुन्हेगार याकूब मेमन याची कबर ७ वर्ष सुरक्षित ठेवण्यात आली. त्यावर फैसल खत्री याच्या कुटुंबियाने आक्षेप घेतला आहे. फैसल खत्री याचा भाऊ डॅनियल याने आपले दुःख व्यक्त केले आहे. बडा कब्रस्तानमध्ये श्रीमंतांना कबरीची जागा विकली जात असल्याचा आरोप डॅनियलने केला आहे.
बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आणि बळी याची एकाच ठिकाणी दफन
मुंबई सेंटर येथील उमरखाडी फैजल खत्री या तरुणाचा १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात एअर इंडिया इमारतीजवळ झालेल्या स्फोटात मृत्यू झाला होता, त्याचा मृतदेहदेखील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आला होता. त्याच बडा कब्रस्तान २०१५ साली मुंबई साखळी स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते.
(हेही वाचा केवळ याकूब मेमनच नाही, तर महाराष्ट्रातील ‘या’ गड-किल्ल्यांवरही कबरी उभारल्यात!)
बडा कब्रस्तानच्या ट्रस्टमध्ये अनागोंदी कारभार
कालांतराने बॉम्बस्फोटातील बळी फैसल खत्री याचे शव काढून त्या कबरीची जागा दुसऱ्याला देण्यात आली होती, असा आरोप फैसल खत्री याचा भाऊ डॅनियल खत्री याने केला आहे. आम्ही ट्रस्टकडे याबाबत पाठपुरावा केला. परंतु आम्हाला कुठलीही दाद देण्यात आली नाही, परंतु मुंबईवर हल्ला करून अनेकांचे बळी घेणारा आतंकवादी याकूब मेमनची कबर सजवण्यात येते, त्याच्या कुटुंबाला जागा विकण्यात येते हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या फैसल खत्रीचा भाऊ डॅनियल खत्री यांनी विचारला आहे. डॅनियलच्या म्हणण्याप्रमाणे बडा कब्रस्तानच्या ट्रस्टमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे, कब्रस्तानमधील कबर परस्पर विकून मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप डॅनियलने केला आहे. माझ्याकडे या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आहे, मी अनेक वेळा तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली गेलेली नाही.
Join Our WhatsApp Community