अल्बर्ट आइन्स्टाइन कुणाला माहिती नाही अशी एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. त्यांनी जगाला अनेक सिद्धांत अर्पण केले आहेत. त्यांचा E=mc2 हा सिद्धांत तर खूप गाजला. या सिद्धांताच्या आधारावर पुढे आण्विक शोध लागलेला आहे.
आइन्स्टाइनच्या अनेक कथा आपण मुलांना ऐकवत असतो. त्यांचे किस्सेही प्रचलित आहेत. त्यांना जगातला एक महान शास्त्रज्ञ मानलं जातं. ते वायोलिनही अस्खलितपणे वाजवायचे. ते मानव धर्म पाळणारे होते.
( हेही वाचा : विमानतळावरून आता २४ तास ‘बेस्ट’ सेवा! पहा वेळापत्रक… )
इस्रायचे राष्ट्रपती होण्याची मिळाली होती संधी
तुम्हाला माहिती आहे का की, अल्बर्ट आइन्स्टाइन यांना इस्रायलचे राष्ट्रपती होण्याची नामी संधी चालून आली होती. विचार करा कुणी तुम्हाला राष्ट्रपती होण्याची ऑफर दिली तर तुम्ही ती नाकाराल का? नाही ना?
अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ही ऑफर नाकारली. वाचून आश्चर्य वाटत असलं तरी हे सत्य आहे. १९५२ रोजी अमेरिकेने अल्बर्ट आइन्स्टाइन यांना इस्राइलचे राष्ट्रपती होण्याची ऑफर दिली होती. त्यांनी ही ऑफर ज्या कारणासाठी नाकारली ते कारण वाचून तुम्ही थक्क व्हाल.
इस्रायलच्या मंत्र्यांनी लिहिलं होतं पत्र
डेव्हीड गोयतन हे इस्रायलचे तत्कालीन मंत्री होते. त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाइनला पत्र पाठवलं होतं. त्यात ते लिहितात, “तुम्ही हे पद स्वीकारुन इस्रायलला यावं अशी मी विनंती करतो. इस्रायल सरकार तुमच्या पुढील सर्व वैज्ञानिक कार्यासाठी सहकार्य करेल.” हे पत्र वाचून आइंस्टाइन भावुक झाले.
आइन्स्टाइन यांनी दिलं हे उत्तर
पण त्यांनी हे पद नाकारताना त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर वाचून आपल्याला जाणीव होईल की मोठ्या माणसांचं मनसुद्धा मोठं असतं. कोणत्याही प्रकारच्या मोठेपणाचा आव न आणता आइन्स्टाइन म्हणाले, “तुम्ही मला हा प्रस्ताव दिला याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. पण हे सांगताना मला अतिशय दुःख होत आहे की मी हे पद स्वीकारु शकत नाही.”
ते पुढे म्हणतात, “सराकारी जबाबदारी स्वीकारण्याचे गुण व अनुभव माझ्याकडे नाहीत. पण ज्यू लोकांशी माझं जवळचं व जिव्हाळ्याचं नातं आहे. ही जबाबदारी मी निभावू शकत नाही.” त्यांनी आपल्या वयाचं कारणही दिलं. आज सत्तेसाठी लोक उपाशी आहेत आणि त्या काळी आइन्स्टाइन यांनी राष्ट्रपतीपद नाकारलं. हे वाचताना आपल्याला आश्चर्य वाटतं.
पण आपण त्यांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी आपलं सबंध जीवन विज्ञानाला अर्पण केलं होतं. त्यांना कोणत्याही पदाच्या बंधनात अडकून राहायचं नव्हतं. ते सबंध जगाचे झाले होते, केवळ एका राष्ट्राच्या सीमेपर्यंत त्यांना बंधिस्त राहायचं नव्हतं.
आइन्स्टाइन ज्यू होते
आइन्स्टाइन हे जन्माने ज्यू होते आणि त्यांचा जन्म जर्मनीत झाला होता. हिटलरच्या ज्यू-विरोधी धोरणांमुळे अनेक ज्यू लोकांना नोकरी सोडावी लागली व अगदी देशही सोडायला लागला होता. त्यांनी ज्यू लोकांना जमेल तेवढी मदतही केली होती.
ते जातीवादाच्या विरोधात होते. जातीवादासाठी त्यांनी अमेरिकेवरही टिका केली होती. त्यांनी संयुक्त राज्यात अमेरिकेच्या विश्वविद्यालयात वंशवादाच्या विरोधात भाषण केलं होतं. दुसर्या महायुद्धाच्या आधी त्यांना जर्मनी सोडून अमेरिकेत राहावं लागलं होतं.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, त्यांनी इस्रायलचं राष्ट्रपतीपद नाकारण्याचं हे देखील कारण असू शकतं की, इस्रायलच्या शासकीय पद्धतीनुसार राष्ट्रपतीपद हे शोभेचं होतं. सगळे अधिकार पंतप्रधानांकडे होते. कदाचित त्यांना शोभेचा बाहुला व्हायचं नव्हतं.
त्यांनी हे पद नाकारल्यानंतर अनेक टिका टिपण्णी झाल्या. पण एवढं मोठं पद नाकारण्याची त्यांनी हिंमत दाखवली एवढं मात्र खरं.