राज्यात कित्येक गुन्हे घडतात त्यापैकी काही घटनाची नोंद केली जाते. काही गुन्ह्यांची दखल तत्पर घेऊन त्यातील आरोपीवर कारवाई केली जाते. मात्र एक असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे की तो गुन्हा करणाऱ्याला न्यायालयाने अनोखीच शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील थोडं आश्चर्यचकीत व्हाल. मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने शेजारच्या महिलेचा विनयभंग केला, या प्रकरणी गुन्हा त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्यावरील गुन्हा रद्द करायचा असल्यास त्याने १० झाडे लावावीत, तसेच तक्रारदार महिलेनेही १० झाडे लावावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
(हेही वाचा – दाऊदचा पुतण्या मुंबई पोलिसांच्या हातून निसटला, थेट पोहचला पाकिस्तानात!)
असा घडला प्रकार
आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या महिलेने केलेल्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी २०१८मध्ये दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करावा, यासाठी संजय गांगुर्डे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रसन्ना वराळे व न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठापुढे होती.
तक्रारदार महिलेने काय म्हटले प्रतिज्ञापत्रात
आम्ही हे प्रकरण सामंजस्याने सोडवले आहे, असे तक्रारदार महिला व गांगुर्डे यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आम्ही एकाच सोसायटीत राहतो. आमचे चांगले संबंध आहेत. गुन्हा नोंदवल्यावर आम्हाला समज आली आणि आम्ही हे प्रकरण सामंजस्याने सोडवले आहे’, असे दोघांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गैरसमजामुळे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्याबाबत आपली काहीच हरकत नाही असे तक्रारदार महिलेने प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे
आठ आठवड्यांत प्रमाणपत्र सादर करा
सहा आठवड्यात पक्षकारांनी त्यांच्या सोसायटीत प्रत्येकी १० झाडे लावल्यानंतर त्यांनी सोसायटीच्या सचिवांकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे. आठ आठवड्यात त्यांनी प्रमाणपत्र सादर न केल्यास एफआयआर रद्द केल्याचा आदेश आपोआप रद्द होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच न्यायालयाने तक्रारदार आणि आरोपीला त्यांच्या सोसायटीच्या आवारात प्रत्येकी १० झाडे लावण्याचा आदेश दिला आहे.