धक्कादायक! २०२१ मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद

यंदाच्या वर्षी २०२१ मध्ये एकूण १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली, गेल्या दहा वर्षातील हा आकडा सर्वाधिक तसेच धक्कादायक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून या वर्षी 29 डिसेंबरपर्यंत वाघांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.

2018 च्या जनगणनेनुसार, भारतात 2 हजार 967 वाघ आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण 2012 पासून वाघांच्या मृत्यूची नोंद सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात येते. 2021 मध्ये वाघ मृतांचा आकडा गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक असू शकतो. 2016 मध्ये, ही संख्या सुमारे 121 होती. यामुळेच प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक राज्यातील वाघांची संख्या

१. मध्य प्रदेश – ५२६ वाघ, ४२ वाघांचा मृत्यू
२. महाराष्ट्र – ३१२ वाघ, २६ वाघांचा मृत्यू
३. कर्नाटक – ५२४ वाघ, १५ वाघांचा मृत्यू
४. उत्तर प्रदेश – अंदाजे १७३ वाघ, ९ वाघांचा मृत्यू

( हेही वाचा : #BalikaDivas2022 राज्य शासनाचा मुलींसाठी अभिनव उपक्रम! )

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यावर पुढील पडताळणी करणार आहे. त्यामुळेच मृतांचा आकडा जास्त असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तर प्रदेश वन विभागासोबत काम करणार्‍या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “ही मृत्यूची संख्या आहे जी प्रत्यक्षात नोंदवली गेली आहे. अनेक वाघ वनक्षेत्रात नैसर्गिक कारणांमुळे मरतात आणि त्यांच्या मृत्यूची नोंद केली जात नाही. 2021 मध्ये भारताने गमावलेल्या वाघांची एकूण संख्या जास्त असू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here