ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेले हिंदुजा कुटुंब आता वेगळे होणार आहे. 108 वर्षे जुन्या हिंदुजा समूहाच्या विभाजनाची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. समूहाची एकूण संपत्ती 14 अब्ज डाॅलर आहे. हिंदुजा बंधूंमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. यापूर्वी रिलायन्स आणि टाईम्स ग्रुपमध्ये विभाजन झाले होते.
हिंदुजा कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहेत. त्यांच्यात 2014 मध्ये एक करार झाला होता. तो संपवण्यासाठी कुटुंबियांमध्ये सहमती झाली असून, 30 जून 2022 रोजी नवा करार करण्यात आला आहे. याच आधारे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस विभाजनाला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
वाद नेमका काय?
हिंदुजा कुटुंबाच्या चार भावांमध्ये 2014 रोजी एक करार करण्यात आला होता, त्यात म्हटले होते की, कुटुंबाचे सर्वकाही प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे. या कराराच्या वैधतेबाबत श्रीचंद हिंदुजा यांनी त्यांचे बंधू जी.पी. हिंदुजा ए.पी. हिंदुजा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
( हेही वाचा: ‘सावरकरांचा सतत अपमान करणा-यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे’? )
कशामुळे पडली ठिणगी ?
स्वित्झर्लंड येथील एस.पी. हिंदुजा प्रा. बॅंकेच्या नियंत्रणासाठी श्रीचंद हिंदुजा यांची मुलगी शानू यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. तेथून या वादाला तोंड फुटले. कुटुंबातील सर्व सदस्यांनाही बॅंकेवर नियंत्रण हवे आहे. या वादामुळे विभाजन सुरु झाले.
Join Our WhatsApp Community