Film City Mumbai : काय आहे फिल्म सिटी मुंबईचा इतिहास?

मुंबई ही औद्योगिक नगरी असल्यामुळे चित्रपटांचं केंद्र देखील आहे.

432
Film City Mumbai : काय आहे फिल्म सिटी मुंबईचा इतिहास?
Film City Mumbai : काय आहे फिल्म सिटी मुंबईचा इतिहास?

मुंबई या सुंदर नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे फिल्म सिटी मुंबई (Film City Mumbai). जगभरात होलिवुडला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यांनी त्यांचा सिनेमा पूर्वीपासूनच युनिव्हर्सल ठेवला. आता तो प्रयत्न भारतात दक्षिण भारतीय सिनेसृष्टीकडून होतो. मात्र मुंबईतील फिल्मसिटीला मोठा इतिहास लाभलेला आहे.

मुंबई ही औद्योगिक नगरी असल्यामुळे चित्रपटांचं केंद्र देखील आहे. फिल्म सिटी (Film City Mumbai) म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरी हे मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेले फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक रेकॉर्डिंग रूम, बागा, तलाव, थिएटर आणि मैदाने आहेत. इथे अनेक मराठी आणि हिंदी मालिकांचे, सिनेमांचे चित्रिकरण होते.

(हेही वाचा – Musafir Khana येथे आर्थिक वादातून फेरी विक्रेत्यांवर गोळीबार)

ही चित्रपटनगरी १९७७ मध्ये उभारण्यात आली. हा परिसर ५२० एकरवर पसरलेला असून इथले वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे. चित्रपट उद्योगाला सुविधा आणि सवलती देण्यासाठी राज्य सरकारने १९७७ मध्ये फिल्म सिटी निर्माण केली. व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म सिटीचा (Film City Mumbai) आराखडा तयार करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

१८९६ साली ल्युमिएर बंधूंनी वॉटसन्स हॉटेलमध्ये सहा मूक चित्रपट दाखवले. भारतीय चित्रपटाची ही सुरुवात होती. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि दिग्गज चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके यांचा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. भारतीय-मराठी माणसाने बनवलेला हा पहिला चित्रपट. म्हणूनच फाळकेंना भारतीय चित्रपटाचे जनक मानले जाते. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीने कधी मागे वळून पाहिले नाही.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसकडून लोकसभेसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर; राहुल गांधी कुठून लढवणार निवडणूक?)

भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे विविध भाषांमध्ये उत्कृष्ट चित्रपट निर्माण झाले. मुंबई ही केंद्रबिंदू ठरली. विशेष म्हणजे २०१९ साली युनेस्कोने मुंबईला ’क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म्स’ म्हणून घोषित केले आहे. २००१ मध्ये फिल्म सिटीचे नाव बदलून ’दादासाहेब फाळके चित्र नगरी’ असे ठेवण्यात आले आहे.

इथे जवळपास सर्वच बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग होते. मंदिर, तुरुंग, न्यायालय, तलाव, पर्वत, कारंजे, गावे, पिकनिक स्पॉट्स, बागा आणि मानवनिर्मित धबधब्याचे कायमस्वरूपी सेट यासह शूटिंगसाठी अनेक प्रकारची लोकेशन्स इथे उपलब्ध आहेत. इथे बॉलिवूड थीम पार्क उभारण्यात आला आहे आणि अनेक पर्यटक भेट देतात. मुंबईकरांचीही गर्दी असते. तुम्ही बॉलीवूड थीम पार्कमध्ये ३ तासांची टूर बुक करु शकता. या ३ तासांच्या टूर पॅकेजमध्ये, लाईव्ह एंटरटेनमेंट शो, नृत्य, कॉमेडी शो असे भरगच्च कार्यक्रम असतात. तसेच थीम पार्कमधील फिरत असलेल्या अनेक कलाकारांसोबत सेल्फी घेण्याची संधी तुम्हाला मिळते. त्यामुळे या नगरीत एकदा आलात तर तुमचा पाय निघणार नाही.

फिल्म सिटी मुंबई (Film City Mumbai) बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली?

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.