होंडा कंपनी सध्या आपल्या क्रूझर श्रेणीतील बाईकवर पुन्हा एकदा काम करतेय आणि रिबेल ५०० ही त्यांची अत्याधुनिक बाईक जून २०२४ मध्ये भारतात लाँच होईल अशी शक्यता आहे. (Honda Rebel 500)
होंडा कंपनीची क्रूझर श्रेणीतील प्रिमिअम बाईक होंडा रिबेल ५०० भारतात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे आणि यावेळी बाईकचा लूक आणि स्टाईलही अत्याधुनिक असेल याची कंपनीने काळजी घेतली आहे. जून २०२४ पर्यंत ती भारतीय बाजारपेठांमध्ये लाँच होईल अशी शक्यता आहे. (Honda Rebel 500)
या बाईकमध्ये ४७१ सीसी क्षमतेचं लिक्विड कूल इंजिन असेल आणि यातून ५५.५ पीएस इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. यात सहा स्पीड ट्रान्समिशन शक्य आहेत आणि ही बाईक घसरणार नाही, यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. (Honda Rebel 500)
Honda Rebel 500 pic.twitter.com/cePSAEzOib
— wiraaps13 (@jawir__) September 16, 2019
(हेही वाचा – M S Dhoni : महेंद्रसिंग धोनीने दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याचे संकेत)
गाडीचा फ्रंट फोर्क टेलिस्कोपिक पद्धतीचा आणि आकाराने ४१ मिमी इतका असेल. तर तर बाईकची फ्रंट डिस्क २९६ मिमी आणि मागची डिस्क २४० मिमी इतकी असेल. मागच्या बाजूला बाईकला शॉक ॲबझॉर्बरही बसवण्यात आले आहेत. या बाईकची किंमत ४,५०,००० रुपयांपासून सुरू होईल अशी शक्यता आहे. (Honda Rebel 500)
आणि तिची स्पर्धा रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०, कावासाकी वल्कन आणि हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ७५० या बाईकशी असेल. या बाईकचे टायर ट्यूबलेस असतील. तर लीटरमागे २६ किलोमीटर इतकी तिची सरासरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Honda Rebel 500)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community