पत्नीच्या विरहाने ‘त्याने’ पोलिस ठाण्यातच स्वतःला पेटवले

पत्नीचा विरह सहन न झाल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पतीने पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ताडदेव येथे घडली. या जाळपोळीत गंभीररीत्या होरपळलेल्या पतीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

पत्नी घर सोडून निघून गेली, आणि…

सर्वजीत मोरे (३०) असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. सर्वजीत हा पत्नीसोबत ताडदेव येथील पोलिस वसाहत येथे राहत होता. वर्षभरापूर्वी मोरे याचा विवाह झाला होता, मंगळवारी काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये क्षुल्लक वादातून भांडण होत होती. गुरुवारी पती पत्नींमध्ये झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन पत्नी घर सोडून निघून गेली होती. पत्नीचा शोध घेत सर्वजीत हा ताडदेव पोलिस ठाण्यात आला व त्याने पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

(हेही वाचा : त्रिपुराप्रकरणी हिंसाचारानंतर राज्यात तणावपूर्ण शांतता! सरकारला उशिरा आली जाग)

पत्नी मिळाली, तरी स्वतःला पेटवून घेतले

दरम्यान पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध घेऊन तिला पोलिस ठाण्यात आणले व तिचा जबाब नोंदवून घेत असताना सर्वजीत हा अंगावर रॉकेल ओतून पुन्हा पोलिस ठाण्याच्या आवारात आला व त्याने मागेपुढे न बघता पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतले. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्यात आली व त्याला तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या सर्वजीत याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here